बहुजन समाज पार्टी च्या कार्यकर्त्यांची रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारला जाब.
काल बारव्हा येथे गणेश विसर्जन दरम्यान एका जीर्ण इमारतीच्या कोसळण्यामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत 45 ते 50 लोक गंभीर जखमी झाले. या जखमींना तात्काळ उपचारासाठी बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नेण्यात आले, मात्र तेथे आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव आढळला. डॉक्टर अनुपस्थित होते, साधी लाइटची व्यवस्था देखील नव्हती, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली.
आरोग्य मंदिरात कोणतीही वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे जखमींना त्वरित लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करावे लागले. या प्रकारानंतर बहुजन समाज पार्टी तालुका लाखांदूरच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य मंदिरास भेट देऊन व्यवस्थेचा जाब विचारला. कार्यकर्त्यांनी आरोग्य मंदिराची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला.
या घटनेमुळे बारव्हा येथील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत बिकट अवस्था समोर आली आहे, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांना कोणतीही वैद्यकीय सेवा मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. यावेळी बसपा लाखांदूर तालुकाअध्यक्ष चेतन बोरकर, रोशन फुले बसपा साकोली विधानसभा प्रभारी, सौरभ नंदेश्वर, राहुल राऊत, प्रणय मेश्राम, जितेश झोडे, मंगेश गोंधळे, अंबादास मेश्राम इत्यादी बसपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
बारव्हा येथील आरोग्य मंदिराची दुरावस्था: जखमींना उपचाराऐवजी रेफर

Leave a Reply