बहुजन समाज पार्टी (बसपा) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज नागपूरच्या दीक्षाभूमीहून “दीक्षाभूमी ते चैत्यभूमी” अशी संविधान जागरण रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात या रॅलीची सुरुवात करण्यात आली. सकाळी 11 वाजता शेकडो कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व बाबासाहेबांना वंदन करून या रॅलीचा प्रारंभ केला.
🌹 ही रॅली महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमधून प्रवास करून, 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर पोहोचेल, जिथे मान्यवर कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केले जाईल. रॅलीचा समारोप धारावी येथे बसपाचे केंद्रीय नेते व महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
🌹 आजच्या रॅलीत प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष शिंदे, प्रदेश महासचिव डॉ. मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, मुकुंद सोनवणे, हुलगेश चलवादी, प्रदेश मिडिया प्रभारी उत्तम शेवडे आणि इतर नेते उपस्थित होते.
🌹 दीक्षाभूमीवरून रॅली लोकमत चौक व संविधान चौकात पोहोचली, जिथे आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांना समर्थन दिलं. इंदोरा चौकात बॅरिस्टर खोब्रागडे यांना माल्यार्पण केल्यानंतर उत्तर नागपूरमध्ये फुलांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं.
🌹 कार्यकर्त्यांना मार्गदर्शनानंतर रॅली कळमना मार्गे भंडाऱ्याकडे रवाना झाली. रॅलीत पन्नास फोर व्हीलर आणि शेकडो टू व्हीलर गाड्या सहभागी झाल्या. संविधान रथ ही रॅलीचं विशेष आकर्षण ठरलं.
बसपाची संविधान जागरण रॅली मुंबईकडे रवाना*

Leave a Reply