साकोली विधानसभा क्षेत्राचा चौफेर विकास
आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नांना यश
साकोली :
विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रात मुलभुत पायाभुत सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ग्रामिण भागात वास्तव्यास असलेल्या नागरीकांचा जीवनमानाचा दर्जा उचंवण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे विशेष लक्ष आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात चौफेर विकास करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याचा सपाटा आ.नाना पटोले यांनी सुरू ठेवला असून आ. पटोले यांच्या प्रयत्नाने विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकास कामाकरीता 5081.64 लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता आ. पटोले यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
Leave a Reply