लाखनी:- तालुक्यातील मानेगाव/ सडक येथील अवंती उमेश सिंगनजुडे व अर्णव उमेश सिंगनजुडे या भावंडांची वर्धा येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा च्या वतीने(१८सप्टेंबर) रोजी जी. बी.क्लब स्विमिंग पूल,खात रोड भंडारा येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्व.निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकणारी अवंती उमेश सिंगनजुडे ही १९ वर्षे वयोगटातील ५० व १०० मिटर फ्री स्टाईल पोहण्याच्या प्रकारात जिल्हातून प्रथम आली आहे.
तर द लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल लाखनीचा विद्यार्थी अर्णव उमेश सिंगनजुडे हा १७ वर्षे वयोगटातील २०० व ४००मिटर फ्री स्टाईल पोहण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आला आहे.
अवंती व अर्णव या भावंडाची २५ सप्टेंबर रोजी वर्धा येथे होत असलेल्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply