जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. परंतु, पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होऊन नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशानिमित्त परतूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी ते जालना जिल्ह्यात रविवारी आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चव्हाण म्हणाले, या वेळेस भाजप आणि महायुतीमधील पक्षांना पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचा समन्वय सुरू आहे. काही गैरसमज दूर झाले असून काही दूर होतील. काही प्रश्न शिल्लक आहेत.
विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान? अशोक चव्हाण यांचा अंदाज

Leave a Reply