FOCUS TODAY

"अचूक बातम्या, प्रत्येक क्षणी"

भीम आर्मी संघटनेतर्फे महिला बालकल्याण सभापती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाखनी – महीला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये यांचा वाढदिवस सोमलवाडा/मेंढा येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडी क्रमांक १ व २ येथील  शिक्षीका व मदतनीस यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महीला व बालकल्याण सभापती यांनी दोन्ही अंगणवाडीतील मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मुलामुलींना प्लास्टिक पाणी बाटल व टिफीन बाक्स दिले.
         भीम आर्मीचे लाखनी युवा तालुकाध्यक्ष अनमोल हूमने यांनी  भीम आर्मी भंडारा जिल्हा सचिव  रोशन खोब्रागडे व लाखनी तालुकाध्यक्ष संतोष ऊकणकर यांच्यासमवेत सभापती मैडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून दीर्घायुष्याची मंगलकामना केली.
        या कार्यक्रमाप्रसंगी  सोमलवाडा ग्रामपंचायत सरपंच ,  उपसरपंच , अंगणवाडी क्रमांक १ व २ येथील शिक्षीका व मदतनीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)