FOCUS TODAY

"अचूक बातम्या, प्रत्येक क्षणी"

बहीण -भाऊ व वडिलाने पोहून केले 5 किमी अंतर पार

नवरात्री निमित्त कारधा पूल ते कोरंबी देवस्थान 5 किंमी अंतर जलवारी

बहीण -भाऊ व वडील प्रथमच एकाच वेळी जलवारीत सहभागी

लाखनी :- आज दिनांक 6 ऑक्टोबर ला भंडारा येथील वैनगंगा नदीत कारधा ते कोरंबी जलवारीचे आयोजन करण्यात आले होते. या जलवारीत अवंती, अर्णव व उमेश सिंगनजुडे या बहीण -भाऊ आणि वडिलांनी पाच किलोमीटर  अंतर पोहून पार केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लाईन्स क्लब भंडारा सेंट्रल आणि स्नेही विकास संस्था भंडारा व वॉटर स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवाच्या प्रसंगी दरवर्षी कारधा ते कोरंबी देवस्थान पर्यंत जलवारी आयोजन करण्यात येते. आज रविवारी दिनांक 6 ऑक्टोबरला सकाळी जलवारीचे आयोजन करण्यात आले. जलवारीची सुरुवात कारधा येथील लहान पुलावरून करण्यात आली.या जलवारीत जिल्ह्यातील अनेक धाडसी व नामवंत 50 जलतरणपटू सहभागी झाले होते.या जलवारीत मानेगाव सडक येथील 16 वर्षीय जलतरणपटू अवंती सिंगनजुडे,14 वर्षीय अर्णव सिंगनजुडे व उमेश सिंगनजुडे सहभागी झाले होतें.प्रथमच या जलवारीत बहीण, भाऊ, वडील सहभागी झाल्याने ते आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. या जलवारीत सहभागी झालेली अवंती पाच किलोमीटर अंतर पोहून पार करेल का? अशी उपस्थितांच्या मनात शंका होती कारण दरवर्षी होणाऱ्या जलवारीत आतापर्यंत एकाही महिला जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या मनात ही शंका होती पण ही शंका तिने निरस्त करून पाच किलोमीटर हे अंतर दोन तास 45 मिनिटांमध्ये यशस्वीपणे पार केले.तर अर्णवणे 2 तास 30 मिनिट मध्ये हे 5 किमी अंतर पार केले.तर उमेश सिंगनजुडे यांनी 2 तास 45 मिनिटात हे 5 किमी अंतर पार केले.या जलवारीत सहभागी होणारी व पाच किलोमीटर अंतर यशस्वीपणे पार करणारी अवंती भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे.आज कारधा ते कोरंबी जलवारीत पाच किलोमीटर अंतर पार केल्याबद्दल अवंती व अर्णव व उमेश सिंगनजुडे या बहीण -भाऊ व वडील यांनी यशस्वीपणे हे अंतर पार केल्याने त्यांचे कौतुक व अभिनंदन डॉ प्रदीप मेघरे,जलतरणपटू प्रशांत कारेमोरे, संजय चिचमलकर डॉ. बाळकृष्ण सार्वे,सदानंद इलमे,भगीरथ धोटे,के झेड शेंडे,महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये,जिल्हा परिषद सदस्या डॉ.मनीषा निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे,माजी जि प सदस्य जयकृष्ण फेंडरकर, उमराव आठवले,रामदास सार्वे, माधवराव भोयर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)