साकोली: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली मतदारसंघातून आपले अधिकृत उमेदवार म्हणुन बहुजन समाजातील नवा चेहरा रोशन फुले यांच्या नावाला पहिली पसंती असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
रोशन फुले हे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांनी मागील काही वर्षांत बहुजन समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या संघटनेच्या माध्येमातून लढा दिला आहे.त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात, वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक एकोपा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो,
त्यांचे उमेदवार म्हणुन नाव समोर आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, आणि या लढतीत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बहुजन समाजातील नवा बदल, नवा चेहरा, नवी दिशा, नविन क्रांती आणि नवा इतिहास रचला जाणार असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
बहुजन समाज पार्टीने जर रोशन फुले यांना उमेदवारी जाहीर केली तर साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे, आणि या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*प्रतिक्रिया*
मी एक बहुजन समाज पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे, पार्टीने दिलेली जबाबदारी मी नेहमी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, जर माझ्या पार्टीने मला निवडणूक लढण्याचे आदेश दिले तर निच्छितच लढणार आणि साकोली विधासभा क्षेत्रातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व प्रत्येक वर्गाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार .
*रोशन फुले*
बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली विधानसभा लढणार – रोशन फुले

Leave a Reply