प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जेष्ठ नाट्यकलावन्त भूमालाताई उईके यांचे राहते घरी वृद्ध कलावन्त मानधन समिती सदस्य यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
त्या प्रसंगी 3 वर्षा पासून जिल्ह्यात वृद्ध मानधन कलावंत समिती नव्हती त्या साठी संघटनेच्या वतीने 29 जुलै 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे संगीतमय आंदोलन करण्यात आले होते.
त्या आंदोलनाची दखल घेत शासनाने वृद्ध कलावन्त मानधन समिती तयार केली. त्या मध्ये साकोली तहसील मध्ये प्रा.नरेश देशमुख कवी साहित्यिक व परमानंद गहाने निर्माता व नाट्य कलावन्त यांची निवड करण्यात आली.
त्यामुळे प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने प्रा.नरेश देशमुख , परमानंद गहाने यांचा सत्कार करण्यात आला.
त्यामुळे प्रबोधनकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, जेष्ठ नाट्य कलावन्त भूमालाताई उईके, संघटनेचे केंद्रीय संयोजक मनोज कोटांगले, जेष्ठ तबलावादक तिर्थानंद बोरकर, साकोली तालुका समन्वयक उमेश भोयर, अध्यक्ष धनंजय धकाते उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, गुड्डू बोरकर, संदीप कोटांगले, प्रशांत भोंगाडे, हासराम तुमसरे, झनकलाल लांजेवार सा. कार्यकर्ता, संकल्प &आरुष कोटांगले उपस्थित होते.
Leave a Reply