कनेरी गाव, १४ ऑक्टोबर २०२४ – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कनेरी गावात प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ देवाजी खोब्रागडे यांच्या प्रेरणेने १९७४ साली स्थापन झालेल्या ६० गावांच्या सर्कलला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्कलचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेशजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात सर्कलचे माजी अध्यक्ष फूल्लूके सर, भागवतजी मेश्राम, आणि मिलिंद बन्सोड यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्याध्यक्ष अमित रामटेके, कोषाध्यक्ष अजीत रंगारी, आणि युवा सदस्य अहिंसक खोब्रागडे यांनीही आपल्या विचारांनी उपस्थितांना प्रेरित केले. विशेष अतिथी अश्विनी भिवगडे, आयुष्यमान करंजेकरजी, आणि आयुष्यमान ताराचंदजी बारसागडे यांनी आपल्या भाषणांमधून समाजप्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्कलचे उपाध्यक्ष आयुष्यमान सुनीलजी बन्सोड यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रथमच घेणारे युवा सदस्य दक्षेसजी मेश्राम यांनी त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांना प्रभावित केले आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली.
सम्यक बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष आयुष्यमान महाविरजी मेश्राम, उपाध्यक्ष आयुष्यमान शैलजी बन्सोड, आणि सदस्य आयुष्यमान अविनाशजी मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.
बॅरिस्टर राजाभाऊ देवाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या गाईडलाईननुसार समाजाशी प्रामाणिक राहून दीर्घकाळ सेवा केली आहे. त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्कलच्या ६० गावांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. कार्यक्रम शांततेत पार पडला, आणि विशेष आकर्षण ठरले बाल वक्ते ताराचंदजी बारसागडे यांच्या नातवाचे सुंदर भाषण, ज्यामुळे उपस्थित सर्वांच्या मनात एक वेगळा ठसा उमटला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे गावात आनंदाचे वातावरण होते, आणि सर्वांनी एकत्र येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
Leave a Reply