लाखनी :-
लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे ‘फ्रेशर्स डे -वेलकम डे’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विश्वास खोब्रागडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भेदराज ढवळे, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अर्चना निखाडे,इतिहास विभाग प्रमुख प्रा.डाॅ. भुवनेश्वरी वाघाये, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. राहुल चुटे,मराठी विभाग प्रमुख प्रा. रोशन भोवते, समाजशास्त्र विभाग प्रमुख स्नेहा शामकुवर, ग्रंथालय विभाग प्रमुख ग्रंथपाल विशाल गजभिये हे होते. यावेळी प्राचार्य डॉ.विश्वास खोब्रागडे तसेच सर्वच प्राध्यापक वर्गानी उपस्थित नवीन बी.ए. प्रथम विद्यार्थ्यांचे ‘फ्रेशर्स डे-वेलकम डे’ कार्यक्रमाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ तसेच शब्दसूमनाने स्वागत केले. त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनात पुढे जाण्याकरिता व यशस्वी होण्याकरिता मौलिक असे मार्गदर्शन सर्वांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण -2020 बद्दल पुरेपूर माहिती प्रा. भेदराज ढवळे व इतर प्राध्यापकांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोशन भोवते तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहा श्यामकुवर यांनी केले.यानंतर महाविद्यालयातर्फे सारंग धारणे, खिलेश चुधरी,कलश गिदमारे, साहिल गिदमारे, प्रणव भुते,सागर ठवकर,डार्विन भोवते,निर्भय तिवाडे,पवन सोनवाणे, चेतन कांबळकर, पियुष नेवारे,राहुल पुराम, समीर साखरे,एश्वर्या मेश्राम, पायल मेश्राम, सुकेशनी जगनाडे, सुहानी चौधरी,योगिता वैद्य,दीपिका पाल, अश्विनी आंबेडारे इत्यादी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या हस्ते ‘फ्रेशर्स डे वेलकम डे’ निमित्ताने भेटवस्तू देण्यात येऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लिपिक खेमराज वाघाये,अजय मेश्राम, श्रीकांत धुर्वे,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे,शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभूळकर,शोएब शेख,तेजेंद्र सदावर्ती यांनी अथक परिश्रम घेतले.
स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे ‘फ्रेशर्स डे- वेलकम डे ‘ चे आयोजन

Leave a Reply