साकोली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. डॉ. अविनाश नान्हे यांना साकोली विधानसभा मतदासंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते धीवर समजातून येतात.
डॉ. नान्हे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. धीवर सामाजिक कार्यक्रम, ओबीसी सेवा संघ मेळावा, ओबीसी जनगणना रॅलीमध्ये सहभाग, मंडल आयोग चेतना रॅली सहभाग, आरोग्य शिबीर यांच्यामार्फत ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
डॉ. अविनाश नान्हे हे प्रख्यात एमबीबीएस, एमडी हृदयरोग तज्ञ आणि मधुमेह तज्ञ आहेत. मागील अनेक वर्षापासून भंडारा जिल्ह्यात ते आरोग्य सेवा देत आहेत त्यांनी शेकडो निशुल्क आरोग्य शिबिरांच्यामार्फत मोफत निदान उपचार व औषध दिलेले आहेत. भटक्या विमुक्त धीवर समाजामध्ये अनेक वर्षांपासून ते सामाजिक काम करत आहेत. तसेच ओबीसी अनुसूचित जाती जमातींच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा उभा केला आहे.
साकोली विधानसभेसाठी वंचितकडून डॉ.अविनाश नान्हे

Leave a Reply