मानेगाव /पोहरा – येथून जवळच असलेल्या धानला जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका शालू आनंदराव उरकुडे याना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद भंडारा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सहपती सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा गुणवता वाढीसाठी त्यांनी विविध शाळा मध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा मध्ये विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी परिश्रम घेतले.शाळेच्या उन्नतीसाठी नावीन्य पूर्ण प्रकल्प राबविले. शिक्षणक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. अनाथ, अपंग, निराधाराना साद माणुसकी समुहाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. रक्तदान शिबीर आणि क्रीडा स्पर्धा, सामूहिक विवाह सोहळे यात महत्वपूर्ण भूमिका घेतली. या कार्याबद्दल त्यांना जिल्हा आदर्श शिक्षका या पुरस्काराने गौरविण्यात आले. आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लाखनी प. सं. गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रशेस फटे, सभापती प्रणाली सार्वे, किशोर कठाणे, जय राठोड, उषा कठाणे, महेश अतकरी, मीनाक्षी सिंगनजुडे, अंजना पिंपळशेडे, शिल्पा भुते तसेच धानला येथील व्यवस्थापन समिती,, साद माणुसकी समूह व अखिल शोसल ग्रुप या सामाजिक संघटनानी त्यांचा गृही जाऊन अभिनंदन केले.
शालू उरकुडे जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित…

Leave a Reply