
लाखनी :- लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे सप्टेंबर महिना ‘बटरफ्लाय मंथ’ चे औचित्य साधून पाच दिवशीय बटरफ्लाय अँड बर्ड शिबीर अमर जवान शहीद स्मारक सेलोटी येथील तलावाजवळ तारांगोविंद बहुदेशीय संस्थाच्या सहकार्याने घेण्यात आले.
यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ॲम्बेसेडर प्रा. अशोक गायधने यांनी निसर्गशिबिरात पाचही दिवस अनेक फुलपाखरे त्यांचा जीवनक्रम,इंग्रजी-मराठी नावे यांचा परिचय प्रत्यक्ष फिरून व चार्ट -छायाचित्राद्वारे देण्यात आला. दुर्मिळ पक्षी व सामान्य पक्षी तसेच विषारी बिनविषारी साप, कीटक, वनस्पती यावर सुद्धा माहिती प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारा व चार्ट -छायाचित्राद्वारे पाच दिवसीय शिबिरात सादर केली गेली . स्थलांतरित दुर्मिळ मान्सून बर्ड चातक व ड्रोनगो कुकू पक्ष्याचे दर्शन यावेळी शिबिरार्थीना घडले. त्याचसोबत भंडारा -गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्याबद्दल जनजागृती कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.सेलोटी येथील तलावावर पाचही दिवस निसर्गभ्रमंती करून अनेक पक्षी व फुलपाखरे तसेच चतुर किटकाचे दर्शन घडविण्यात आले. अमर जवान शहीद स्मारकचे प्रणेते व तारांगोविंद बहुदेशीय संस्था सेंदूरवाफाचे अध्यक्ष सुभेदार ऋषीं वंजारी, ग्रीनफ्रेंड्स पदाधिकारी अशोक वैद्य,अशोक नंदेश्वर, अमर जवान शहीद स्मारकच्या शिबिराचे समन्वयक सी आर पी एफ कॉन्स्टेबल घनश्याम दिघोरे यांनी पाचही दिवसात विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाबद्दल माहिती देऊन निसर्गशिबिरास पुरेपूर सहकार्य केले.
याचवेळी लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने मागील 20 वर्षांपासून अखंडपणे कोणत्याही वर्षी खंड न पडू देता वर्षभर एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दोन वर्षे काळात सुद्धा सातत्याने सक्रियपणे कसे उपक्रम घेतले गेले याची माहिती शिबिरार्थीना देण्यात आली.
याच ‘बर्ड व बटरफ्लाय निसर्गशिबिरा’त अनेक विषारी बिनविषारी सापांची ओळख, वनस्पतीची, फुलपाखरे, अनेक दुर्मिळ व स्थलांतरित पक्षी त्याचप्रमाणे विविध वन्यजीव त्याचबरोबर महाराष्ट्रातील सहा राज्य मानके यांची ओळख वेगवेगळ्या दिवशी छायाचित्राद्वारे करून देण्यात आली.या शिबिरात एकंदर 13 प्रजातीची फुलपाखरे प्रत्यक्ष तर छायाचित्राद्वारे 30पेक्षा जास्त प्रजातीचे फुलपाखरे तसेच 26 प्रजातीचे पक्ष्याचा प्रत्यक्षात तर छायाचित्रद्वारे 50पेक्षा जास्त पक्ष्यांचा परिचय शिबिरार्थीना झाला.
निसर्गशिबिरात हर्षा पाखमोडे,माही लांजेवार,माहेश्वरी सोनटक्के, फाल्गुनी सावरकर,साक्षी सेलोकर,नयना पाखमोडे, होमेश्वरी रोकडे,ऋतुजा सार्वे,समीक्षा रोकडे,यश्मिता नवखरे, लाव्या नवखरे,पियुष हलमारे,आकाश दिघोरे, सुजल पाखमोडे,कुणाल गिऱ्हेपुंजे, स्वयंम निखाडे, जावेद माकडे,आदिल मांढरे, खिलेश पाखमोडे,दानिश पाखमोडे, पियुष पंचबुद्धे, समर्थ पाखमोडे, वैभव दिघोरे,साहिल डोरले, नीरज पाखमोडे रितेश रोकडे,समीर पाखमोडे, नितीन तितीरमारे,आलोक निखाडे, अभिषेक निखाडे,श्याम पाखमोडे, प्रणय दिघोरे,देवेंद्र लांजेवार, हर्षल पाखमोडे, दत्तक रोकडे इत्यादीनी बटारफ्लाय व बर्ड शिबिरात सहभाग नोंदवून सहभाग प्रमाणपत्र प्राप्त केले.
लाखनी निसर्गमहोत्सवानिमित्त आयोजित या निसर्गशिबिरात सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोपाल बोरकर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, रमेश गभने, सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे यांच्यासमवेत रा.स्व. संघाची पर्यावरण विभाग भंडारा -गोंदिया जिल्हा शाखा, नगरपंचायत लाखनी पर्यावरण व स्वच्छता विभाग,नेफडो शाखा भंडारा जिल्हा, अभाअंनिस जिल्हा शाखा भंडारा व तालुका शाखा लाखनी, अशोका बिल्डकॉन पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर , सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ मनोज आगलावे इत्यादीचे सहकार्य लाभले.
Leave a Reply