लाखनी – मानवतावादी संत – महापुरूषांच्या कार्याचे स्मरण करून भीम आर्मीचे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाला मान्य करीत दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी लाखनी तालुक्यातील ग्राम मांगली (बांध ) या ठिकाणी भीम आर्मी ग्रामशाखेचे उद्घाटन करून शाखा कार्यकारीणीचे गठन करण्यात आले.
भीम आर्मीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रूपेश गोस्वामी , भंडारा जिल्हा सचिव रोशन खोब्रागडे , भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख अश्वीन गोस्वामी , भीम आर्मी लाखनी तालुकाध्यक्ष संतोष ऊकणकर , युवा तालुकाध्यक्ष अनमोल हूमने , लाखनी शहर अध्यक्ष आशिष नंदागवळी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डि.पी बडोले यांच्या विशेष उपस्थीतीत ग्रामवासीयांची सभा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. रूपेश गोस्वामी यांनी सभेला मार्गदर्शन करीत भीम आर्मीची भूमिका व्यापक स्वरूपात मांडली.
सभेला उपस्थीत लोकांद्वारे सर्वानुमते भीम आर्मी ग्रामशाखेची कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यामध्ये भीम आर्मी ग्रामशाखा अध्यक्ष म्हणून अनिकेत बोरकर , उपाध्यक्ष सिद्धार्थ गेडाम , सचिव उमेश बोरकर व कोषाध्यक्षपदी शरद वालदे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारीणीचे पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देवून स्वागत करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन रोशन खोब्रागडे तर आभार दिलीप बडोले यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी हर्षल बोरकर , रूपेश वालदे , अजय वालदे , आलोक रामटेके , उमेश्वर बोरकर , शुभम वालदे , भिमराव बोरकर , निखील मेश्राम , अशोक वालदे , तुषार बोरकर , पृथ्वीराज वालदे , अभय बोरकर , वाल्मीक वालदे , मनीष वालदे , आरती वालदे , मंगेश वालदे , मुकेश वालदे , अनमोल बारसागडे व सिद्धांत रामटेके यांनी सहकार्य केले.
मांगली (बांध ) येथे भीम आर्मीची ग्रामशाखा कार्यकारीणी गठीत

Leave a Reply