लाखनी :-मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण न देता वेगळ्या (विशेष) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे याकरिता लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जी. प. सदस्या सुर्मीला अशोक पटले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन पाठविले आहे या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चेकडून काय कार्यवाही केली जाते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. इतर मागास प्रवर्गात मोडणारे नागरिक हजारो वर्षापासून सामजिक गुलामगिरी व विषम- तेचा त्रास सहन करून जीवनयापन करीत होते. १९७९ मध्ये मंडळ आयोगाची स्थापना करण्यात पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी १९९० साली मंडळआयोगाच्या शिफारशी लागू केल्या व १९९२ साली इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) ला आरक्षण लागू करण्यात आले. सद्यस्थितीत केंद्रात २७ टक्के तर महाराष्ट्र राज्यात १९ टक्के इतर मागास प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला अशोक पटले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे.इतर मागास प्रवर्गाचीलोकसंख्या जवळपास ५५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे सरकारने दिलेले आरक्षण तुटपुंजे असून मराठा समाज इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. आरक्षण हा सर्वांचा अधिकार आहे व तो सर्वांना मिळाला पाहिजे यास् तव मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून टिकणारे आरक्षण देणे उचित ठरेल असे जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला अशोक पटले यांनी मुख्यमंत्री मुख्यमत्रा एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. तसेच विधानसभा व विधान परिषदेचे विशेष सत्र बोलावून मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण न देण्याब् एबचा अध्यादेश काढावा जेणेकरून इतर इतर मागास प्रवर्गातील बांधवांचे अधिकार अबाधित राहतील अशी जी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.
मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे – जि.प.सदस्या सूर्मिला पटले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply