लाखनी ;- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते.ज्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.एकीकडे नेतेमंडळींनी राज्यभरात आपले दौरे सुरू केलेले असतानाच आता दुसरीकडे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांचे भावी आमदार,भावी मुख्यमंत्री,भावी मंत्री असे बॅनर झळकण्यास सुरुवात झाली आहे.परंतु,याच पार्श्वभूमीवर चक्क भावी मुख्यमंत्री म्हणून नावारूपास आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्याच जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.मनिषा निंबार्ते यांचे वाढदिवसानिमीत्त भावी आमदार म्हणून बॅनर चक्क एक भाजपा सरपंचाने झळकले असल्याने भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण साकोली विधानसभा मतदारसंघात लावण्यात आलेल्या या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.तर या विषयावर त्याच्यांशी विचारणा केली असता या सदर्भात बोलायला टाळले तर सद्या मी काँग्रेस पक्षातच आहे अशी माहीती माध्यमाना दिली.मात्र असे बॅनर झंळकल्यने चर्चा तर होईलच तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून हालाचालींना वेग आला आहे.
नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्याच जि.प.सदस्या डॉ.मनीषा निंबार्ते यांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर

Leave a Reply