FOCUS TODAY

"अचूक बातम्या, प्रत्येक क्षणी"

ओबीसी शिष्ट्यमंडळाचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन…

शिष्ट्यमंडळ उपमुख्यमंत्री यांना निवेदन देतांना

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातील ओबीसी शिष्ट्यमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवास्थान देवगिरी बंगला  येथे ६ सप्टेंबरला संपन्न झाली ,या बैठकीत ओबीसींच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली ,चर्चेअंती उपमुख्यमंत्री याना ओबीसी समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले ‘बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी ,सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०%आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारश महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार कडे करावी ,ओबीसींची मंजूर झालेली ७२ वसतिगृह त्वरित सुरु करावी ,नॉन क्रिमीलेयर ची मर्यादा १५ लक्ष करावी ,सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा ,व्यावसायिक अभ्यासक्रमात मुलांना १००%शिष्यवृत्ती द्यावी ,ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत देणाऱ्या कर्जाची मर्यादा १५ लक्ष करावी .डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा ,ओबीसी वस्तीगृहास डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह नाव द्यावेत .इतर मागास कल्याण मंत्री राजेंद्र भुजाडे यांचे निलंबन रद्द करावे .भंडारा जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची मागील ५ वर्षांपासून प्रलंबित मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकरिता स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावेत,सुरु झालेल्या वसतिगृहांना त्वरित निधी द्याव्यात यासारख्या मागण्याचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ,बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर यांनी दिले या शिष्ट्यमंडळात भंडारा जिल्ह्यातील ओबीसी प्रतिनिधी प्रा.उमेश सिंगनजुडे ,ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते ,गोपाल नाकाडे ,संजय लेनगुरे ,गंगाधर भदाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .ओबीसी समाजच्या मागण्या लवकरच सोडवू असे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्ट्यमंडळाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)